जळगाव, दि.13:- राज्याचे सहकार
राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा गुरुवार दि.14 सप्टेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार
दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वा. 50 मि.नी. अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे
स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 7 वा. पाळधी
ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव.
सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी.
दुपारी 1.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 2 वा. 45 मि.नी.
जळगावकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. जळगाव- धरणगाव तालुका महावितरण वीज वितरण कामांचा
आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ:- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव), दुपारी 4 वा. 30 मि.नी. मुक्ताईनगर प्रयाण.
सायं. 6.00 वा. मुक्ताईनगर येथे आगमन व सभेस उपस्थिती. रात्री 8.00 वा. सोईनुसार
पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
00000
No comments:
Post a Comment