जळगाव,
दि.11 :- निझामोद्दीन खान उर्फ
निराले, राहणार शफीपूर, जनपद उन्नव, तालुका शफीपूर, जि. उन्नाव, उत्तरप्रदेश हा
भुसावळ रेल्वे स्थानकावरुन गोवा एक्सप्रेस ट्रेन नं. 12779 या गाडीच्या जनरल
बोगीतून सनवोर्देम (गोवा) ते लखनऊ दरम्यान प्रवास करीत असताना भुसावळ किंवा पुढील
रेल्वे स्टेशनवरुन 22 जून 2017 रोजी एक वाजेनंतर
हरविल्याची तक्रार त्याचे वडील शफीक यांनी केली आहे.
हरविलेल्या
व्यक्तीचे वर्णन - वय 22 वर्ष, वर्ण सावळा, शरीरयष्टी मध्यम, उंची अंदाजे 5 फुट 7
इंच, चेहरा गोल, केस लांब, सरळ, साईड कट केलेले, पोषाख निळ्या रंगाचा फुल बाहीचा
टी शर्ट, त्यावर समोरील बाजूस पांढरे पट्टे व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट याप्रमाणे
आहे.
या हरविलेल्या व्यक्तीची माहिती मिळताच
अथवा त्याच्याविषयी कोणालाही काहीही माहिती असल्यास त्यांनी पोलिस उप निरीक्षक,
लोहमार्ग पोलीस ठाणे, भुसावळ अथवा रेल्वे पोलीस स्टेशन, भुसावळ येथे फोन नं.
02582-222338 वर पोलीस उप निरीक्षक यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस उप
निरीक्षक लोहमार्ग पोलिस स्टेशन, भुसावळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
०००००
No comments:
Post a Comment