जळगाव,
दि.१८ - फेब्रुवारी-मार्च, 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,
कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात
येणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10
वी) लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आज मंडळाचे
सचिव कृष्णकुमार पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व
विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्याच्या
मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2018 च्या लेखी परीक्षेचे
संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च्ा
माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा (पुनर्रचित व जुना अभयासक्रम) बुधवार
दि. 21 फेब्रुवारी, 2018 ते मंगळवार दि 20 मार्च, 2018 या कालावधीत तर माध्यमिक
शालान्त प्रमाणपत्र परीक्षा गुरुवार दि. 1 मार्च, 2018 ते शनिवार 24 मार्च, 2018
या कालावधीत घेण्यात येणार आहे.
या कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या
अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर आजपासून
उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य
वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक
शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम
असणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व
विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे अन्य माध्यमातून व्हायरल झालेले
वेळापत्रक ग्राहय धरु नये.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक
स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा,कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात
येणार आहे. वेळापत्रकाबाबत काही सुचना,
हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसाच्या आत लेखी
स्वरुपात पाठविण्याचे आवाहन सचिव, राज्यमंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment