जळगाव, दि: 29 - ‘बनाना सिटी ते गोल्ड सिटी’ ची ओळख नागरीकांना पुस्तक रुपात होण्यासाठी जिल्ह्याचे कॉफी टेबल पुस्तक (बुक) तयार करण्यात येत आहे. या पुस्तकामध्ये जिल्ह्याची ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, साहित्यिक, कृषी, औद्योगिक, पर्यटन स्थळांची तसेच जिल्ह्याच्या वैशिष्टपूर्ण माहितीचा समावेश करण्यात येणार आहे. कुणाकडे याप्रकारची माहिती, जुने संदर्भ व छायाचित्रे असल्यास ती जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडे जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्याचे विविध
क्षेत्रातील अनन्य साधारण महत्व लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याची एकत्रित माहिती असलेले कॉफी टेबल पुस्तक तयार
करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुस्तकात जिल्ह्याची वैशिष्टपूर्ण माहिती
देण्याचा प्रयत्न असून यासाठी कुणाकडे जिल्ह्याच्या माहितीविषयी काही महत्वपूर्ण
माहिती, संदर्भ व छायाचित्रे असल्यास ती जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती
कार्यालय, प्रशासकीय इमारत, टप्पा क्र. 3, पहिला मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव
येथे पाठवावी. अथवा diojalgaonnews2017@gmail.com या ईमेल वर पाठवावी. जुने संदर्भ
व छायाचित्रे स्कॅनकरुन संबंधितांना पुन्हा परत करण्यात येतील.
जिल्ह्याचा जुना इतिहास
जनतेसमोर मांडण्यासाठी तसेच जिल्ह्याची वस्तुनिष्ठ एकत्रित माहिती तयार होण्यासाठी
ज्यांच्याकडे जुने संदर्भ असतील त्यांनी ते जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडे पाठवून
या कामात सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment