Monday, 4 September 2017

लोकशाही दिनी प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर





            जळगाव दि: 4 -  लोकशाही दिनी प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करुन तक्रारदारास न्याय देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिल्या.
            या महिन्याचा लोकशाही दिन येथील जिल्हा नियोजन भवनात  संपन्न झाला. या लोकशाही दिनास उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा उपनिंबधक विशाल जाधवर, यावलचे उप वनसंरक्षक  संजय दहिवले, महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर,‍ उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्यालय रशीद तडवी,  जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक दामले, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे आदि उपस्थित होते.
            आजच्या लोकशाही दिनात एकूण 668 अर्ज प्राप्त झाले आहे.
०००००

No comments:

Post a Comment