जळगाव,दि.१८-
फेब्रुवारी-मार्च, 2018 मध्ये घेण्यात
येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन भरण्यास
आजपासून (18) सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळ, पुणे यांचेमार्फत फेब्रुवारी-मार्च, 2018 मध्ये घेण्यात
येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेची नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी
प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेतंर्गत व
तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी परीक्षेचे
आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत नियमित शुल्कासह ऑनलाईन
पध्दतीने आवेदनपत्रे भरण्याची तारीख 18 सप्टेंबर, 2017 ते 9 ऑक्टोंबर, 2017 ही आहेत. तर बॅकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख 10
ऑक्टोंबर ते 17 ऑक्टोंबर, 2017 ही आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी
विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची
तारीख 31 ऑक्टोंबर 2017 ही आहे.
विलंब शुल्कासह आवेदन पत्रे भरण्याची तारीख 10 ऑक्टोंबर ते 17 ऑक्टोंबर असून
बॅकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख 18 ऑक्टोंबर ते 25 ऑक्टोंबर, 2017 ही आहे. उच्च
माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह
विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख
31 ऑक्टोंबर 2017 ही आहे.
परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने
विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ
महाविद्यालयामार्फत भरावी. माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी
ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी
विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भरलेल्या (Upload केलेल्या ) आवेदन पत्रांच्या याद्या
दिलेल्या तारखांप्रमाणे तसेच प्रचलित पध्दतीने बॅक ऑफ इंडियामध्ये चलनाव्दारे
शुल्क भरुन चलनाची प्रत विभागीय मंडळाकडे जमा करावी. नियमित शुल्कासह तसेच विलंब
शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाव्दारेच
भरण्यात यावे. आवेदनपत्रामध्ये शासन आदेशानुसार विद्यार्थ्यांने त्याचा आधारकार्ड
क्रमांक भरणे अनिवार्य असल्याचे सचिव, राज्यमंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment