Monday, 18 September 2017

महिला लोकशाही दिनी सात अर्ज दाखल



        जळगाव, दि. १८ - दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विशाल जाधवर, सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, तहसीलदार संजय गांधी निराधार योजना श्रीमती सुचिता चव्हाण, पोलीस उप निरिक्षक सुप्रिया देशमुख यांचेसह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
      या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी एकूण सात अर्ज प्राप्त झाले. त्यातील एक अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी तर उर्वरित सहा अर्ज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव या कार्यालयाशी संबंधीत आहे. हे अर्ज संबंधितांकडे देऊन त्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी श्री. मुंडके यांनी दिल्या.
                                                                        ०००००

No comments:

Post a Comment