Thursday, 28 September 2017

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ३ ऑक्टोबर रोजी



       जळगाव, दि.28 - दर महिन्याला होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन यावेळी मंगळवार 3 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
            जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्‍यात येते. परंतु ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी गांधी जयंतीची सार्वजनिक सुट्टी असल्याने सोमवार ऐवजी मंगळवार 3 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनी नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment