Friday, 18 May 2018

1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

•    जिल्ह्यातील मतदार, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
          जळगाव, दि. 18 - भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई  यांनी दिलेल्या निर्देशानुसार  जिल्ह्यात 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे. 
     या कार्यक्रमांतर्गत 15 मे ते 20 जुन, 2018 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत घरोघरी भेटी देवून पडताळणी करण्यात येणार आहे. तर शनिवार दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तसेच दि.1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर, 2018 या कालावधीत याबाबत  दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून दि. 30 नोव्हेंबर, 2018 पूर्वी याबाबतचे दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 3 जानेवारी, 2019 पूर्वी मतदार याद्यांच्या डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई करण्यात येणार असून दि.4 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
          मतदार नोंदणीच्या विशेष कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदार, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी सक्रीय भाग घेवून निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे. जेणेकरुन मतदार याद्या अचूक व परिपूर्ण होऊन ऐनवेळी पात्र मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळली गेल्याबाबतची तक्रार करण्यास वाव राहणार नाही. असे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                          000

No comments:

Post a Comment