जळगाव दि. 8 :- भारत
सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,
कोलकाता अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी कार्यन्वित असलेल्या
अर्थसहाय्याच्या समान निधी योजनेतून ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर
भवन मुंबई यांच्यामार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते.
त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना
www.rrrlf.nic.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्ज या
संकेतस्थळावरुन उपलब्ध (download) करुन घ्यावा.
समान
निधी योजना (Matching Schemes) (2017-18) (राज्य शासनाच्या 50 टक्के व
प्रतिष्ठानच्या 50 टक्के अर्थसहाय्य), सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार,
बांधणीसाठी अर्थसहाय्य (कमाल मर्यादा 10 लक्ष) इतकी आहे.
राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत
इच्छुकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अधिक
माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.nic.in हे संकेतस्थळ पहावे.
ग्रंथालयांनी
समाननिधी योजनेसाठी विहित पद्धतीत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी
भाषेमधील प्रस्ताव चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 15
मे, 2018 पर्यत पोहचतील अशा बेताने पाठवावेत. असे आवाहन श्री. किरण ग्रं. धांडोरे,
ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांनी
राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.
00000
No comments:
Post a Comment