जळगाव, दि. 2 - जळगाव शहर महानगर
पालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी मतदार यादीत नाव नोंदविण्याची अंतिम मुदत 11 मे,
2018 पर्यंत असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी दिनांक 1 जानेवारी,
2018 रोजी ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत. व अद्यापपर्यंत ज्यांनी मतदार
नोंदणी केलेली नाही. त्यांनी आपले मतदार नोंदणीचा नमुना नं. 6 चे अर्ज तहसिलदार
तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी, जळगाव यांच्याकडे दिनांक 11 मे, 2018 पर्यंत देणे
आवश्यक आहे. त्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी होवूनच त्यांचे नाव मतदार
यादीमध्ये समाविष्ठ केले जाईल. व त्यांनाच जळगाव शहर महापालिकेच्या निवडणूकीत
मतदान करता येईल. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जदारांना या निवडणूकीत मतदान करता
येणार नाही. तसेच यापूर्वी नावनोंदणी केलेल्या ज्या मतदारांचे मतदार यादीत
छायाचित्र नसेल त्यांनी आपले रंगीत छायाचित्र सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे
तातडीने जमा करावेत. असेही जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment