जळगाव, दि. 23 - शासनाच्यावतीने शेतकऱ्यांकडील तूर खरेदी करण्यासाठी पणन विभागातर्फे जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या 9 खरेदी केंद्रामार्फत 6 हजार 754 शेतकऱ्यांची 42 कोटी 51 लाख 29 हजार 975 रुपयांची 78 हजार क्विंटल तूर नाफेडमार्फत खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी परिमल साळुंखे यांनी दिली आहे.
गेल्या हंगामात राज्यात तूरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा. शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी राज्य शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यासाठी तूर खरेदी केंद्र सुरु केले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही अमळनेर, चोपडा, जळगाव, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव या नऊ तालुक्यात माहे फेब्रुवारी 2018 पासून तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. या केंद्रावर आतापर्यंत 6 हजार 754 शेतकऱ्यांची 78 हजार 5 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. सर्वाधिक तूर खरेदी जामनेर केंद्रावर करण्यात आली असून या केंद्रावर 1797 शेतकऱ्यांची 15 हजार 578 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तर मुक्ताईनगर केंद्रावर 1092 शेतकऱ्यांची 15 हजार 577 क्विंटल, अमळनेर केंद्रावर 1058 शेतकऱ्यांची 14 हजार 7 क्विंटल, बोदवड केंद्रावर 1015 शेतकऱ्यांची 13 हजार 948 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना बोनससह प्रति क्विंटल 5450 रुपये इतका भाव देण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या 78 हजार क्विंटल तूरीपैकी 43 हजार 272 क्विंटल तूर ही शासनाच्या गोडवूनमध्ये तर उर्वरित तूर इतर ठिकाणी साठवून ठेवण्यात आल्याचेही श्री. साळुंखे यांनी सांगितले आहे.
000
[5/23, 6:46 PM] BODAKE SAHEB: *भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी*
*मुलाखतीस 29 मे रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन*
जळगाव, दि. 23 - संघ लोकसेवा आयोग भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी 5 ते 14 जून, 2018 या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार खाली नमूद पात्रता पूर्ण करीत असल्यास त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे दिनांक 29 मे, 2018 रोजी कार्यालयीन वेळेत मुलाखतीस स्वखर्चाने हजर रहावे. मुलाखतीस येण्या आधी PCTC Training च्या Google Plus पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध Check List आणि महत्वाच्या तारखा (Importanr Dates) यांचे अवलोकन करुन त्याची प्रिंट काढून घ्यावी. तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊनलोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढुन ते पुर्ण भरुन आणावे.
केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन येणे आवश्यक आहे.
कंबाईड डिफेस सर्वि्हसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी. त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एन.सी.सी (C) सर्टिफिकेट A किंवा B ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एन.सी.सी.ग्रुप हेडक्वार्टरने एस.एस.बी. साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एस.एस.बी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एस.एस. बी कॉल सेटर असावे किंवा एस.एस.बी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक, यांचा दुरध्वनी क्रमांक 0253-2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment