Thursday, 24 May 2018

सावळ येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात प्रवेशसाठी अर्ज करण्याचे आवाहन


     जळगाव, दि. 24 - शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कार्यरत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, भुसावळ जि. जळगाव येथे इयत्ता 8 वी ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी रिक्त झालेल्या जागांवर नव्याने प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याचे गृहपाल यांनी कळविले आहे.
     प्रवेशासाठी अर्जाचे वाटप विनामुल्य सुरु असून गरजु विद्यार्थ्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. वसतिगृह प्रवेश हा त्या त्या प्रवर्गातील रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार दिला जाणार आहे. वसतिगृहात निवड झालेल्या प्रवेशितांना शासनामार्फत निवास, भोजन, शैक्षणिक लेखन साहित्य, अभ्यासक्रमिक पुस्तके दिले जातात. पदवी/पदविका अभ्यासक्रमित विद्यार्थ्यांना रु 4000/- व रेणकोट/ बुट इ. साठी 500/- व प्रतिवर्षाकरीता दोन शालेय गणवेश रु 1000/- ड्रेसकोड गणवेश खर्च रु. 2000/- तसेच दरमहा निर्वाह भत्ता रु. 500/- विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतात. असे गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, भुसावळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment