जळगाव, दि. 2 - तालुका कृषि
अधिकारी, जळगाव कार्यालयामार्फत कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व
ट्रॅक्टर चलित औजारे वाटप करण्यासाठी प्राप्त अर्जामधून सोडत काढण्यात येणार आहे.
ही सोडत शुक्रवार, 4 मे, 2018 रोजी सकाळी 10 वा कृषि चिकित्सालय, ममुराबाद येथे
काढण्यात येणार आहे.
कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित औजारे
मिळण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व अर्जदार शेतक-यांनी या सोडतीच्या वेळेस उपस्थित
राहावे. असे आवाहन तालुका कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
०००
No comments:
Post a Comment