जळगाव, दि. 21 - दहशतवाद
व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी
किशोर राजे निंबाळकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी श्री. निंबाळकर यांनी
दहशतवाद व हिंसाचारविरोधातील शपथ दिली.
याप्रसंगी
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपजिल्हाधिकारी
(महसुल) अभिजीत भांडे पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील यांचेसह
जिल्हाधिकारी कार्यालय व इतर विविध विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी
उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधात लढण्याची व समाजात शांती, सामाजिक एकोपा, सामंजस्य टिकविण्याची व
वर्धिष्णू करु. तसेच मानवी जिवीत मुल्य धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तिंचा
प्रतिकार करण्याची शपथ घेतली.
०००
No comments:
Post a Comment