जळगाव, दि. 21 - दर महिन्याच्या तिसऱ्या
सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.
यावेळी
महिला लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्ज व निकाली अर्जाचा आढावा घेण्यात आला. संबंधीत
विभागांनी महिला लोकशाही दिनातील तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याच्या
सूचना अप्पर जिल्हाधिकारी श्री. गाडीलकर यांनी सर्व संबंधितांना दिल्यात. आजच्या
लोकशाही दिनात पोलिस, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, आयुक्त, महानगरपालिका,
मुख्याधिकारी, नगरपालिका, वरणगाव, अधिक्षक, भुमिअभिलेख, उप मुख्य कार्यकारी
अधिकारी, ग्रामपंचायत यांचेशी संबंधित प्रत्येकी एक अर्ज होता. याप्रसंगी जिल्हा
उपनिबंधक, सहकारी संस्था, पोलीस, नायब तहसीलदार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
व संरक्षण अधिकारी हे उपस्थित होते.
०००
No comments:
Post a Comment