Thursday, 31 May 2018

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली अधिकारी, कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्त महाराष्ट्र करण्याची शपथ


         



           जळगाव, दि. 31 - जागतिक तंबाखू विरोध दिवसाच्या निमित्ताने आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना तंबाखू विरोधी शपथ दिली. 
            जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोध दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात आजपासून 6 जूनपर्यंत तंबाखू विरोध सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त आज जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना तंबाखू, जर्दा, खर्रा आणि धुम्रपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, घर आणि परिसर तंबाखू मुक्त रहावा, इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करण्यासाठी प्रयत्न करण्याचा तसेच भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील राहून माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखूमुक्त करण्याची शपथ दिली.
            यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा जळगाव शाखेच्यावतीने तंबाखू विरोधी दिवसानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या तंबाखू टाळा, हद्यात राहणाऱ्या आपल्या परिवारासाठी आणि समाजासाठी या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तंबाखू विरोधासाठी नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी हे पोस्टर शहरातील प्रमुख ठिकाणी लावण्यात येणार आहे. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी डॉ. प्रसन्ना रेदासणी, गनी मेमन, श्री. विनोद बियाणी, राजेश यावलकर, धनश्याम महाजन यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment