जळगाव, दि. 22 - माल वाहतूक
व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी,
कागदपत्रे/पाकीटे/मालाची घरपोहोच वाहतूक करणारी कुरीअर कंपनी तसेच मालाची साठवणूक
करणारे वितरक, माल जमा करणारे व्यावसायिक यांना कॉमन करिअर म्हणून क्षेत्रीय
नोंदणी प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे अर्ज करुन कॅरेज बाय
रोड अॅक्ट, 2007 व कॅरेज बाय रोड नियम, 2011 अंतर्गत 31 मे, 2018 पूर्वी नोंदणी
प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. अशी माहिती जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन
अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
कॅरेज
बाय रोड अधिनियम, 2007 च्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय,
नवी दिल्ली यांचे अधिसुचना क्र. जीएसआर-176 (ई) दि. 28 फेब्रुवारी, 2011 नुसार
कॅरेज बाय रोड नियम, 2011 प्रसिध्द करण्यात आले असून नियम अधिसूचना केंद्र
शासनाच्या www.morth.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध
आहे.
तरी सर्व संबधितांनी उप
प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी प्रमाणपत्र दि. 31 मे, 2018
पर्यंत प्राप्त करुन घ्यावेत. अन्यथा मोटार वाहन अधिनियम तसेच नियमातील
तरतूदींनुसार त्यांचेवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही श्री. पाटील, उप
प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
०००
No comments:
Post a Comment