जळगाव, दि. 28- सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समाज भुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्यश्री
कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर
पारितोषिक पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राविण्य पुरस्कार इत्यादी
व्यक्तीच्या नावे दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी इच्छुकांनी
आपले अर्ज दिनांक 15 जून 2018 पूर्वी सादर करावेत. असे आवाहन खुशाल गायकवाड, सहायक
आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात
येणा-या विविध पुरस्कारांबाबत समाजामध्ये अनुसुचीत जाती, भटक्या जमाती, विमुक्त
जाती, अपंग कल्याण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक व संस्था यांनी
या सर्व पुरस्कारांसाठीचे अर्ज दिनांक 15 जून 2018 पावेतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
सामाजिक न्याय भवन, महाबळ, मायादेवी मंदिरासमोर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
कार्यालय, जळगाव येथे जमा करावेत. तसेच पुरस्कारासाठीचे निकष व विविध पुरस्कारासाठी
निश्चित केलेले विहित नमुन्यातील अर्ज https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर व कार्यालयात उपलब्ध करुन
देण्यात आलेले आहेत. असेही श्री. गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव
यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment