जळगाव दि. 11 :-
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची होवू न घातलेल्या
निवडणूकीसाठी जळगाव जिल्ह्यातील 21 मतदान केंद्र प्रस्तावित केले आहेत. तालुका
निहाय मतदान केंद्र याप्रमाणे आहेत.
अमळनेर-
तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय आणि राजसारथी सभागृह, चोपडा- तलाठी मिटींग
हॉल, तहसिल कार्यालय, यावल- तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय, रावेर- संजय
गांधी योजना शाखा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नविन तहसिल कार्यालय, मुक्ताईनगर-
तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय, बोदवड- सभागृह तहसिल कार्यालय, भुसावळ- डी.
एस. हायस्कूल, भुसावळ पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडील खोली क्र.2 आणि डी. एस.
हायस्कूल, भुसावळ पूर्वेकडील उत्तर दक्षिण इमारत, उत्तरेकडील खोली क्र. 3, जळगाव-
आर.आर. विद्यालय, पूर्व-पश्चिम इमारत, खोली क्र. 6, आणि आर. आर. विद्यालय,
पूर्व-पश्चिम इमारत, जिमखाना टेनिस रुम जवळील खोली क्र. 13, भाऊसाहेब काशिनाथ लाठी
विद्यामंदिर, पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडून खोली क्र. 2, भाऊसाहेब काशिनाथ लाठी
विद्यामंदिर पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडून खोली क्र.4, धरणगाव- तहसिलदार यांचे
दालन, तहसिल कार्यालय, एरंडोल- तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय, पारोळा-
मिटींग हॉल तहसिल कार्यालय, भडगाव- तहसिलदार यांचे दालन तहसिल कार्यालय, चाळीसगाव-
नानासाहेब वाय. एन. चव्हाण कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव पूर्वेकडील
उत्तर-दक्षिण इमारत उत्तरेकडील खोली क्र.3 आणि नानासाहेब वाय. एन. चव्हाण कला,
विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव पूर्वेकडील उत्तर-दक्षिण इमारत उत्तरेकडील
खोली क्र.5, पाचोरा- तहसिलदार यांचे दालन तहसिल कार्यालय, जामनरे- जि.प.प्राथमिक शाळा
मेन हॉल, वाकी रोड, जामनेर असे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी
शिक्षक मतदार संघ नाशिक विभाग श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी
पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment