जळगाव, दि. 29 - महाराष्ट्र राज्य
मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण जाणून
घेण्यासंदर्भात विभागावार जनसुनावणी घेण्यात येत आहे. याकरीता व्यक्ती, संघटना व
सामाजिक संस्थांमार्फत माहिती संकलीत करण्यात येत आहे. याकरीता आयोगातर्फे मंगळवार 5 जून, 2018 रोजी
जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जाहिर जनसुनावणी आयोजित
करण्यात आलेली आहे.
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या
कार्यक्षेत्रामधील ज्या व्यक्ती, संस्था, संघटना यांना मराठा समाजाच्या आर्थिक,
शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणासंबंधी आयोगासमोर निवेदन सादर करावयाचे आहे. किंवा
आपले म्हणणे मांडावयाचे आहे, अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांनी लेखी पुराव्यासह व
ऐतिहासिक दस्तऐेवजासह/माहितीसह 5 जून, 2018 रोजी आपले निवेदन सकाळी 11 ते सायं. 5
या वेळेत जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव याठिकाणी जनसुनावणीचे
वेळी आयोगा समोर सादर करावे. असे आवाहन संशोधन अधिकारी, महाराष्ट्र राज्य
मागासवर्ग आयोग, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment