Monday, 28 May 2018

जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न



                  जळगाव, दि. 28 - जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक आज जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात संपन्न झाली.
            राज्यातील दारिद्ररेषेखालील आणि दूर्गम भागातील पात्र कुटुंबाना निवडक जीवनावश्यक वस्तु सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले.
            या बैठकीत जिल्ह्यात एईपीडीएस प्रणालीव्दारे वितरण होत असलेल्या अन्नधान्याचा सद्यपरिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी घेतला. या बैठकीस उपस्थित अशासकीय सदस्यांनी स्वस्त धान्य वितरणासाठी सुरु करण्यात आलेल्या पॉस मशीनबाबत काही सुचना केल्यात. या सुचनांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचनाही जिल्हाधिका-यांनी बैठकीत दिल्यात. या वितरण प्रणालीमुळे पात्र लाभार्थीना अन्नधान्य मिळेल तसेच सोशल ऑडिटव्दारे पात्र लाभार्थींची निवड करण्यात येईल असे बैठकीत सांगण्यात आले
            या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांचेसह अशासकीय सदस्य श्रीमती मिनाताई तडवी, आत्माराम सुपडू कोळी, सुनिल जावळे, राम कृष्ण पाटील, श्रीमती सुषमा पाटील व इतर शासकीय सदस्य उपस्थित होते.
०००

No comments:

Post a Comment