Thursday, 24 May 2018

मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसंदर्भात आयोगासमोर 5 जून रोजी म्हणणे मांडण्याचे आवाहन


      जळगाव, दि. 24 - मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसंदर्भात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे तज्ञ सदस्य, सचिव व आयोगाचे अधिकारी यांचे उपस्थितीत  मंगळवार ,5 जून, 2018 रोजी  जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोगातर्फ जाहिर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
       मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात विभागावर जन सुनावणी घेऊन व्यक्ती, संघटना व सामाजिक संस्थेमार्फत माहिती संकलीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
          जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामधील ज्या व्यक्ती, संस्था, संघटना याना मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणासंबंधी आयोगासमोर निवेदन सादर करावयाचे आहे. किंवा आपले म्हणणे मांडावयाचे आहे. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांनी लेखी पुराव्यासह व ऐतिहासिक दस्तऐवजासह/माहितीसह 5 जून, 2018 रोजी आपले निवेदन सकाळी 11 ते सायं. 5 या वेळेत जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव या ठिकाणी जनसुनावणीचे वेळी आयोगासमोर सादर करावीत. असे संशोधन अधिकारी, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment