जळगाव, दि. 23 - संघ लोकसेवा आयोग भारतीय सैन्यदल, नौदल व
वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून सर्व्हिस सिलेक्शन
बोर्ड (SSB) या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी छात्रपूर्व
प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील
नवयुवक व नवयुवतीसाठी 5 ते 14 जून, 2018 या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय
करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यातील
इच्छुक उमेदवार खाली नमूद पात्रता पूर्ण करीत असल्यास त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालय, जळगाव येथे दिनांक 29 मे, 2018 रोजी कार्यालयीन वेळेत मुलाखतीस
स्वखर्चाने हजर रहावे. मुलाखतीस येण्या आधी PCTC Training च्या Google Plus पेज
वरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध Check List आणि महत्वाच्या तारखा
(Importanr Dates) यांचे अवलोकन करुन त्याची प्रिंट काढून घ्यावी. तसेच त्यामध्ये
दिलेले सर्व परिशिष्ट डाऊनलोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढुन ते
पुर्ण भरुन आणावे.
केंद्रामध्ये
एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक
आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन येणे आवश्यक आहे.
कंबाईड
डिफेस सर्वि्हसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी एक्झामिनेशन
(NDA-UPSC) पास झालेली असावी. त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र
झालेले असावे. एन.सी.सी (C) सर्टिफिकेट A किंवा B ग्रेड मध्ये पास झालेले असावे व
एन.सी.सी.ग्रुप हेडक्वार्टरने एस.एस.बी. साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल
ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एस.एस.बी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry
Scheme साठी
एस.एस. बी कॉल सेटर असावे किंवा एस.एस.बी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक
माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक,
यांचा दुरध्वनी क्रमांक 0253-2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष
अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment