Tuesday, 22 May 2018

हातमाग विणकरांसाठी आवाहन


 जळगाव, दि. 22 - केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यातील चौथी हातमाग गणनेचे काम मे. कर्वी डाटा मॅनेजमेंट सर्व्हिस लि. हैद्राबाद या संस्थेमार्फत पुर्ण झालेले आहे. या हातमाग गणनेमध्ये यापुर्वी पात्र असलेला हातमाग विणकर अनावधानाने समाविष्ट झालेला नाही किंवा यावेळेस नव्याने हातमाग विणकर आहे. मात्र त्याचे नांव हातमाग गणनेच्या यादीत नाही. अशा सर्व हातमाग विणकरांनी संबंधित प्रादेशिक उपसंचालक, (वस्त्रोद्योग) यांचे कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधुन आपले नाव हातमाग विणकर यादीत समाविष्ट करुन घ्यावे. असे आवाहन संचालक, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन, नागपूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            हातमाग विणकर यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कार्यालयाचा पत्ता- प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, मुंबई, 7 वा मजला, चरई टेलिफोन एक्स्चेंज बिल्डींग, मावळी मंडळ रोड, ठाणे (पश्चिम)-400601, ईमेल- rddtexiles३mumbai@rediffmail.com दुरध्वनी क्रमांक-022-25405363 व वस्त्रनिर्माण निरिक्षक यांचा मो. क्रमांक 9405368309 येथे संपर्क साधावा. असे संचालक, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन, नागपूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
      

No comments:

Post a Comment