Thursday, 24 May 2018

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक-2018 जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू

जळगाव, दि. 24 -  भारत निवडणूक आयोगाने दि. 24 मे, 2018 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीची घोषणा केली असून, जळगाव जिल्ह्यासह नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांत आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकानुसार दिली आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम याप्रमाणे आहे. अधिसुचना प्रसिध्दी 31 मे 2018 रोजी, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक 7 जुन, नामनिर्देशन पत्राची छाननी 8 जून रोजी, उमेदवारांनी नामनिर्देशन माघार घेण्याचा शेवटचा दिनांक 11 जून, मतदान दिनांक 25 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत, मतमोजणी दिनांक 28 जून 2018 रोजी होणार आहे. याची सर्व शिक्षक मतदार, राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार व संबंधित शासकीय विभाग यांनी नोंद घ्यावी. असेही जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.
0 0 0

No comments:

Post a Comment