Thursday, 3 May 2018

वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा


        जळगाव,दि.3:- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            शुक्रवार दि. 4 मे, 2018 रोजी सकाळी 6.45 वा. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7.00 वा. अजिंठा  शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने जामनेर, जि.जळगावकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर जि.जळगाव येथे आगमन  व राखीव. रात्री मुक्काम जामनेर जि.जळगाव
00000

No comments:

Post a Comment