Saturday, 19 May 2018

बोदवड येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात प्रवेशसाठी अर्ज करण्याचे आवाहन


        जळगाव, दि. 19 - शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कार्यरत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, बोदवड जि. जळगाव येथे इयत्ता 8 वी ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देण्याबाबतची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती गृहपाल यांनी दिली आहे.
            अनु.जाती, अनु. जमाती, वि.जा.भ.ज. विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, अनाथ व अपंग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी वसतीगृहात प्रवेश घ्यावयाचा असल्यास विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज वसतीगृहाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. परिपुर्ण भरलेला अर्ज अंतिम परिक्षेचा निकाल लागल्यापासून 15 दिवसांच्या आत वसतीगृहात जमा करावा. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम वसतीगृहाच्या प्रवेश अर्जासोबत व कार्यालयात पाहावयास मिळतील.
            तरी गरजू विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशासाठी संपर्क साधावा. असे आवाहन गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, बोदवड जि. जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment