जळगाव, दि. 16 - जिल्ह्यातील ज्या
आजी/माजी सैनिकांनी व त्यांच्या विधवांनी जमीन मिळण्यासाठी अर्ज केले असतील.
तसेच त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्याचे निवारण करण्यासाठी सोमवार 21 मे, 2018
रोजी दुपारी 4.00 वाजता किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या उपस्थितीत नियोजन हॉल, जिल्हाधिकारी
कार्यालय आवार, जळगाव याठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यातील
ज्या आजी/माजी सैनिक व त्यांच्या विधवांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी आवश्यक ती
कागदपत्रे घेऊन या बैठकीस हजर रहावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,
जळगाव यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment