Thursday, 3 May 2018

परदेशात शिक्षण घेण्याकरीता शिष्यवृत्ती मिळणेसाठी 31 मे पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन


       जळगाव, दि. 3 - आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याकरीता शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणेसाठी संबंधित विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव यांचेकडे 31 मे, 2018 पर्यंत प्रस्ताव जमा करावेत. असे आवाहन प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी केले आहे.
            या योजनेचा लाभ मिळणेसाठी विद्यार्थ्यांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 6 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेची सविस्तर माहिती www.mahatribal.gov.in या संकेत स्थळावर देण्यात आली आहे. याबाबतची माहिती सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावावी. तसेच जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्री. हिवाळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment