जळगाव,
दि. 16 - जिल्हा कौशल्य विकास रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्यावतीने मनुमाता बहुउद्देशीय संस्था,
जळगाव व्दारा अरुणोदय ज्ञानप्रसारक मंडळ एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालय,
एज्युकेशन स्ट्रीट, खाजामियॉ दर्ग्यामागे, येथे शनिवार 19 मे, 2018 रोजी सकाळी 10.00
वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता विभागाच्या सहायक संचालक श्रीमती अनिसा तडवी यांनी दिली आहे.
या
मेळाव्यात खाजगी आस्थापनांमधील 135 रिक्तपदांसाठी निवड करण्यात येणार आहे. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांची
शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, आय.टी.आय व पदवीधर असावी. उमेवारासा मेळाव्यासाठी स्वखर्चाने
उपस्थित रहावे लागेल. मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे,
बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादी माहितीसह मेळाव्याच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित
राहणे आवश्यक आहे. नियोक्त्याकडुन देण्यांत येणा-या वेतनाबाबत व इतर सवलतीबाबत
रोजगार मेळाव्याचे दिवशी संबंधित कंपनीचे अधिकारी माहिती देणार आहेत.
जिल्ह्यातील
जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती तडवी
यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment