जळगाव, दि. 31 -
जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतू नाशिक विभागात सध्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2018 चा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झालेला असून आचारसंहीता लागू झालेली आहे. त्यामुळे जून महिन्यात 4 जून, 2018 रोजी होणारा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
000
No comments:
Post a Comment