Tuesday, 22 May 2018

जळगाव पासपोर्ट सेवा केंद्राचे बुधवारी


       जळगाव, दि. 22 - भारतीय डाक विभाग व परराष्ट्र मंत्रालय (विदेश राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचा उद्घाटन समारंभ बुधवार, 23 मे, 2018 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, बळीराम पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती डाक अधिक्षक बी. व्ही. चव्हाण यांनी दिली आहे.
            पासपोर्ट सेवा केंद्र तहसील ऑफिसच्या बाजूला असलेल्या पोस्ट खात्याच्या क्वार्टर मध्ये सुरु करण्यात येत आहे. या सेवा केंद्राचे उदघाटन खासदार ए. टी. (नाना ) पाटील यांच्या हस्ते होणार असून या समारंभास आमदार सुरेश भोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी औरंगाबाद डाक विभागाचे पोस्टमास्तर जनरल श्री. प्रणवकुमार, मुंबई येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. श्रीमती स्वाती कुलकर्णी, डाक अधीक्षक श्री. बी. व्ही चव्हाण हे उपस्थित राहणार आहे. असे डाक अधिक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment