Friday, 16 November 2018

ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 10 कोटी रुपये खर्चाच्या 22 कि.मी. रस्त्यांचे भूमिपुजन संपन्न




             जळगाव, दि. 16 - शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जळगाव ग्रामीण मतदार संघात पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारण्याबरोबरच मतदार संघातील गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे. त्याचबरोबर गावातील शाळांमधून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी. यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तरसोद येथे केले.
            मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व शासनाच्या विविध योजनांतंर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघात 10 कोटी रुपये निधी खर्चून करण्यात येणाऱ्या विविध गावांतील 22 कि.मी. रस्त्यांचे भूमिपुजन राज्यमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते श्री क्षेत्र तरसोद येथे बोलत होते.  
            या कार्यक्रमास जळगाव बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, प्रतापराव पाटील, पंचायत समिती सदस्य मुकुंद ननावरे ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, माजी उपसभापती धोंडूभाऊ पाटील आदि उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुलाबराव वाघ हे होते.
            यावेळी बोलतांना ना. पाटील म्हणाले की, तरसोद प्रसिध्द तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. या तीर्थक्षेत्राला पर्यटनाचा ब दर्जा मिळण्यासाठी सतत प्रयत्न केल्यामुळे शासनाने समावेश केला आहे. या तीर्थक्षेत्राला शासनाकडून मंदिराच्या विकासासाठी 5 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असून हा निधी लवकरात लवकर मिळवून मंदिराचा विकास करण्यात येणार आहे. तरसोद येथे येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर व्हावा याकरीता राष्ट्रीय महामार्ग 6 ते तरसोद रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याच्या 3.42 कि.मी.  लांबीच्या 1 कोटी 83 लक्ष रुपये खर्चाच्या, फुफनगरी ते तरसोद तसेच नशिराबाद ते तरसोद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 38 रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याच्या 8.50 कि.मी. लांबीच्या 2 कोटी 71 लक्ष रुपये खर्चाच्या रस्त्यांचे आज भूमिपुजन होत आहे. या रस्त्याला पुढील 5 वर्षात एक जरी  खड्डा पडला तरी तो कंत्राटदाराला स्वत:ला भरावा लागणार आहे. त्यामुळे हा रस्ता अतिशय चांगला होणार असून यामुळे भाविकांचा त्रास वाचणार आहे.
            यावेळी बोलतांना ना. पाटील पुढे म्हणाले की, गावातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित  शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी याकरिता सतत प्राधान्य देऊन मतदार संघातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला.  त्यामुळे जळगाव तालुक्यातील अनेक शाळांना आयएसओ मानांकन मिळाल्याचेही  त्यांनी  यावेळी सांगितले. यावेळी  14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेसाठी दोन प्रोजेक्टर तसेच गावातील तीन अंगणवाड्यांना प्रत्येकी एक टीव्ही संच व 10  बेचेंसचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावातील मागासवर्गीय नागरीकाना विविध उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. मतदार संघातील प्रत्येक गावातील नागरीकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तरसोद गावातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेत या गावाचा समावेश केला आहे.  तरसोद येथे आरओ युनिटचे लोकार्पण तसेच गावात फ्लेवर ब्लॉक बसविणाच्या कामांचा शुभारंभ राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
            यावेळी ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, गुलाबराव वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी तरसोद गावाच्यावतीने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते व सोसायटीच्यावतीने चेअरमन व संचालक यांनी राज्यमंत्र्यांचा सत्कार केला.
            कार्यक्रमाच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासविविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
            यापूर्वी राज्यमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते प्रजिमा 57 ते धार ते चोरगाव रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करणे 8.83 कि.मी. 4 कोटी 80 लक्ष, वंजारी ते बोरखेडा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे 1.20 कि.मी. 67 लक्ष रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन करण्या आले.
000

No comments:

Post a Comment