Saturday, 3 November 2018

जिल्हा नियोजन अधिकारी पदी प्रतापराव पाटील रुजू


            जळगाव, दि. 3 - जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून प्रतापराव पाटील यांची शासनाने नियुक्ती केली आहे. त्यानुसार श्री. पाटील यांनी आज जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जळगांव या पदाचा कार्यभार धारण केला आहे.
            श्री. प्रतापराव पाटील यांनी एप्रिल 2008 पासून आतापर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी नाशिक व अहमदनगर येथे तसेच जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) नाशिक या पदांवर काम केले आहे. त्याचबरोबर श्री. पाटील यांनी सन 2008 ते 2011 व सन 2017-18 या कालावधीत उपायुक्त (नियोजन) या पदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळलेला आहे.
            श्री. पाटील यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांचेकडून विद्यापीठाच्या सांख्यिकी विषयाच्या अभ्यास मंडळावर स्वीकृत सदस्य म्हणूनही निवड झाली आहे. याबाबतची अधिसूचना विद्यापीठाच्यावतीने दि 12 ऑक्टोबर, 2018 रोजी काढण्यात आली आहे.
000

No comments:

Post a Comment