जळगाव, दि. 13 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सन 2019 मध्ये घेण्यात येणा-या स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून हे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर ( वेबसाईटवर) प्रसिध्द करण्यात आले आहे.
शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन 2019 मध्ये घेण्यात येणा-या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणा-या इतर संस्था इत्यादिंकडून आयोजित करण्यात येणा-या परिक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. जेणेकरुन आयोगाच्या व संबंधित संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही. यासंदर्भात विधीमंडळातही अनेकवेळा चर्चा झाली असून त्यावेळी विधीमंडळात देण्यात आलेल्या आश्वासनानुसार कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत पाठवून यासंदर्भात दक्षता घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांना आयोगामार्फत आयोजित परीक्षांची जास्तीत जास्त संधी मिळावी. हा आयोगाचा उद्देश असल्याचेही श्री सुनिल अवताडे, उप सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
०००

No comments:
Post a Comment