Saturday, 3 November 2018

वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या तारखेत बदल


            जळगाव, दिनांक ३ : जिल्ह्यातील सर्व वाहनधारक / वाहन प्रतिनिधी यांना कळविण्यात येते की, दिनांक ५ नोव्हेंबर, २०१८ रोजी जिल्हाधिकारी, जळगाव यांनी स्थानिक सुटी घोषित केली आहे.  तसेच दिनांक ९ नोव्हेंबर, २०१८ रोजी शासकीय सुटी जाहिर झाली आहे.
            त्यामुळे ज्या वाहनधारकांनी दिनांक ५ व ९ नोव्हेंबर, २०१८ रोजीच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे. अशा वाहनधारकांच्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाची चाचणी दिनांक १२ ते १९ नोव्हेंबर, २०१८ या दरम्यान घेण्यात येईल. अशी माहिती जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
0 0 0

No comments:

Post a Comment