Friday, 2 November 2018

नगरपरिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘वॉक फॉर चाळीसगाव’ चा पालकमंत्री ना. पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ


             

           चाळीसगाव दि. 2 :- येथील नगरपरिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त आज ‘वॉक फॉर चाळीसगाव’ चे आयोजन करण्यात आले होते.  ‘वॉक फॉर चाळीसगाव’  ची सुरुवात राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. 
            यावेळी आमदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगरपरिषदेच्या अध्यक्षा आशालता चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, उपाध्यक्षा आशा चव्हाण, नगरसेवक, नगरसेविका, उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच  विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार, महिला, पुरुष, युवक व मान्यवर उपस्थित होते.
            ‘वॉक फॉर चाळीसगाव’ ची  सुरवात ग्रामदैवत आनंदा मातेच्या मंदिरापासून करण्यात आली.  तर समारोप नगरपरिषदेच्या नवीन इमारतीच्या आवारात  करण्यात आला.  रॅलीतील स्वच्छता हिच सेवा संदेश देणारे चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.  वॉक फॉर चाळीसगाव यात सामील झालेल्या सर्वांना नगरपरिषदेमार्फत नगरपरिषदेचा शताब्दी  महोत्सवाचा लोगो असलेला सफेद रंगाचा टी शर्ट व टोप्यांचे वाटप करण्यात आले होते. तत्पूर्वी पालकमंत्री ना. पाटील यांनी ग्रामदैवत आनंदा मातेचे दर्शन घेवून विधीवत पूजन केले.
00000

No comments:

Post a Comment