Friday, 2 November 2018

निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर करावा


            जळगाव दि. 2 - निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासनाचे निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारक तसेच इतर राज्याचे शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतन धारक तसेच इतर राज्याचे निवृत्तीवेतन धारक जे जळगाव कोषागारातुन निवृत्तीवेतन घेत असतील त्यांनी दरवर्षी नोव्हेंबर हयातीचा दाखला कोषागारात सादर करणे आवश्यक आहे.
            राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना हयातीचा दाखला देण्यासाठी बायोमेर्ट्रिक पद्धतीने बोटाचे ठसे व आधार कार्ड लिंक करुन जीवन प्रमाणपत्र पोर्टलद्वारे, मोबाईलद्वारे करण्याची सुविधा जिल्हा कोषागार कार्यालय व तालुका उपकोषागार कार्यालय येथे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याचा सर्व निवृत्तीवेतनधारकांनी लाभ घ्यावा.
            तसेच पुर्वीप्रमाणे बँकेमार्फत हयातीचे दाखले देण्याचीही कार्यवाही करावयाची आहे. तरी जीवन प्रमाणपत्र बायोमेर्ट्रिक पद्धतीने जिल्हा कोषागार कार्यालय व तालुका उपकोषागार कार्यालय व नियमितपणे                 1 नोव्हेंबर, 2018 पासून निवृत्तीवेतन आहरीत करतांना बँकेत हयातीचे प्रमाणपत्र स्वाक्षरी करुन सादर करणे आवश्यक आहे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्र. सि. पंडीत यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment