Saturday, 17 November 2018

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष श्री. अभ्यंकर रविवारी नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणार


     जळगाव, दि.17 - महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष श्री. ज. मो अभ्यंकर हे रविवार 18 नोव्हेंबर, 2018 रोजी सकाळी 10 वाजेपासून अजिंठा शासकीय विश्रामगृहात अल्पसंख्याक समाजातील तक्रारग्रस्त व्यक्तींना भेटून त्यांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत.  अशी माहिती आयोगाचे अवर सचिव यांनी दिली आहे.
          श्री. अभ्यंकर हे नागरीकांनी दिलेल्या निवेदनाबाबत व समक्ष दिलेल्या माहितीबाबत संबंधित अधिका-यांशी बोलून त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणार आहेत. तक्रारदाराची भूमिका समजून घेणार असून संबंधीत अल्पसंख्यांक व्यक्तींवर अन्याय होत असल्याचे दिसून आल्यास त्याबद्दलची नियमाधीन समयबध्द कार्यवाही करण्यास संबधित अधिका-यास आदेशित करणार आहेत. तसेच अल्पसंख्याक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालकांच्या समस्यांबाबतही सुनावणीची कार्यवाही करणार असल्याचेही अवर सचिव यांनी पत्रकात म्हटले आहे.
०००

No comments:

Post a Comment