Monday, 19 November 2018

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त प्रकाशित ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ ग्रंथ उपलब्ध


            जळगाव, दि. 19 - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ हा ग्रंथ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आला आहे. हा ग्रंथ जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, जळगाव येथे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी कळविले आहे.
            या ग्रंथात महाराष्ट्र आणि महात्मा गांधीजींच्या वैशिष्टपूर्ण संबंधांचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. या ग्रंथासाठी महाराष्ट्रातील गांधी विचारांचे ज्येष्ट अभ्यासक, चिंतक, लेखक अशा मान्यवरांचे लेख घेण्यात आले आहे. या ग्रंथात गांधींचा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील विभूती आणि गांधीजी, महाराष्ट्रातील ठिकाणे आणि गांधीजी, गांधी विचार आणि अनुभवलेले गांधीजी या विषयांवर मान्यवरांचे वाचनीय लेख प्रसिध्द करण्यात आले आहेत.
            गांधींजीची विचारधारा आजसुध्दा देशाच्या सर्वांगीण, सर्वसमावेशक विकास व प्रगतीसाठी कशी गरजेची आहे हे समजून घेण्यासाठी या ग्रंथाचा नव्या पिढीला मोठा उपयोग होणार आहे. या ग्रंथाचे मुल्य फक्त दोनशे रुपये इतके आहे. तरी वाचकांनी अंक मर्यादित असल्याने जिल्हा माहिती कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून आपल्या अंकाची प्रत राखून ठेवावी. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे. 
000

No comments:

Post a Comment