Saturday, 17 November 2018

जलाशयाखालील जमिनीचा विनियोग चारा पीके घेण्यासाठी करण्याचे आवाहन


          जळगाव, दि. 17 - राष्ट्रीय कृषि योजने अंतर्गत अत्यल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दृष्काळ घोषित तालुक्यात जलाशयाखाली / तलावाखाली  ( Reservoin / Tank- Bed)  जमिनीचा विनियोग गाळपेर क्षेत्रावर वैरण पिकांची लागवड करण्यासाठी करण्यात यावा. असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी कळविले आहे.
           जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती यांचेमार्फत लाभार्थ्याचे अर्ज दिनांक  ४ डिसेंबर २०१८ पर्यंत मागविण्यात येत आहेत. तसेच जलसंपदा मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशयाखालील/ तलावाखालील जमिन रब्बी  व उन्हाळी हंगामासाठी नाममात्र भाडेपट्टयावर मिळेल. राष्ट्रीय कृषि योजना व इतर योजनांमधून बियाणे उपलब्ध तरतूदीच्या अधिन राहून विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येतील, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000

No comments:

Post a Comment