जळगाव, दि. 15 :- जिल्ह्यात 20 ते 30
नोव्हेंबर 2018 या कालावधीत होणा-या सैन्य भरती मेळाव्यची पूर्वतयारी आढावा बैठक
अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना,
नांदेड, नंदुरबार व परभणी अशा एकूण 9 जिल्ह्यातील उमेदवार सहभागी होणार आहे.
या भरती मेळाव्यात, सोल्जर जनरल (GD)
सोल्जर टेकनिकल, सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन) दारुगोळा निरिक्षक), सोलजर टेक्निकल
(नर्सिग असिस्टंट) सोल्जर टेक्निकल (नर्सिग असस्टिंट व्हेटरनेटी) सोल्जर क्लर्क/
स्टोअर कीपर टेलिकल / इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सोल्जर टे्रडसमन या पदांचा समावेश
आहे. या भरती मेळाव्यास सुमारे 50 हजार विद्यार्थी उपस्थित राहातील असा प्राथमिक
अंदाज असल्याने त्यानुसार आवश्यक त्या उपाययोजना करण्यात बाबत बैठकीत चर्चा
करण्यात आली.
अप्पर
जिल्हाधिकारी श्री. गाडीलकर यांनी भरती मेळाव्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा व
सुविधांचा बाबनिहाय आढावा घेवून संबंधित यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सुचना
दिल्यात. यात प्रामुख्याने जिल्हा क्रीडा विभागांने जिल्हा क्रीडा संकुल, पोलीस
विभागातर्फे पोलीस कवायत मैदान व इतर सुविधा उपलब्ध करुन देणे, पोलिस बंदोबस्त, महानगरपालिकेतर्फे फिरते
स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, सफाई कामगार, सार्वजनिक बांधकाम विभागाने रोड रोलर,
पाण्याचे टँकर विद्यूत विभागाकडून विद्यूत पुरवठा, आरोग्य विभागाने आरोग्य सेवा,
रुग्णवाहिका, डॉक्टर्स उपलब्ध करुन देणे, मेळाव्यासाठी येणा-या मुलांना निवास,
भोजन व्यवस्थेसाठी स्थानिक सेवाभावी संस्थांची मदत घेणे, रेल्वे स्थानक, बस स्थानक
येथे हेल्थबुथ उभारणे आदि बाबींबाबत संबंधित विभागास सुचना दिल्यात.
या
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अकलाडे,
कौशल्य विकास विभागाच्या सहायक संचालक श्रीमती अनिसा तडवी, पोलीस निरीक्षक सुनील
कुऱ्हाडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेप्ट.कमांडर मिनल मधु पाटील, शिक्षणाधिकारी
बी. एस. पाटील, यांचेसह औरंगाबाद येथील भरती मंडळाचे व विविध विभागांचे अधिकारी आदि
अधिकारी उपस्थित होते.
०००
No comments:
Post a Comment