जळगाव दि. 15 :- येथील जिल्हा माहिती
कार्यालयाच्या छायाचित्रण विभागातील जुन्या साहित्यांची विक्री करण्यात येणार आहे.
ज्या व्यक्ती अथवा संस्थांना जुने साहित्य खरेदी करावयाचे आहेत, त्यांनी आपले
दरपत्रक जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव यांचे नावे बंद पाकीटात जिल्हा माहिती
कार्यालय, प्रशासकीय इमारत, टप्पा क्र. 3, पहिला मजला, आकाशवाणी चौक, जळगाव येथे
दिनांक 26 नोव्हेंबर, 2018 रोजी सायंकाळी 5-00 वाजेपर्यंत पाठवावे. असे जिल्हा
माहिती अधिकारी विलास बोडके यांनी कळविले आहे.
दरपत्रक
पाठवितांना बंद पाकीटाच्या वरील बाजूस छायाचित्रण साहित्य खरेदीसाठी दरपत्रक
असे लिहावे. पाकिटाच्या डाव्या बाजूस दरपत्रक पाठविणाऱ्या व्यक्तीचे/संस्थेचे नाव
नमुद करावे. विक्री करावयाचे जुने साहित्य या कार्यालयात कार्यालयीन वेळेत
(सुट्टीचे दिवस वगळून) पहावयास मिळेल. दरपत्रकाचा नमुना व सुचना पत्रक कार्यालयात
विनामुल्य उपलब्ध आहे. साहित्य खरेदीसाठी इच्छूकांनी विहीत नमुन्यातच दरपत्रके
सादर करावे. असे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment