जळगाव, दि. 22 – आपत्ती ही नैसर्गिक व मानव निर्मित असते, आपत्ती सांगून येत नाही आपत्तीच्या काळात
सर्वानी आपदग्रस्तांना तातडीने मदत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज एन. डी. आर. एफ पुणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणाचे दिप प्रज्वलन करुन
जिल्हाधिकारी डॉ. किशोर राजे निंबाळकर यांनी शुभारंभ केला यावेळी ते बोलत होते. या
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके एन डी आर एफ चे पुण्याचे अरुणकुमार बेरा व जिल्हयातील सर्व विदयालयाचे
मुख्याध्यापक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर उपस्थित
मुख्याध्यापकांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आपत्ती
व्यवस्थापन फक्त शाळा महाविद्यालयांसाठी नसून सर्वांसाठी आहे, आपल्या जिल्हयातील
शाळेची इमारत, पाय-या परिसरातील मधमाशांचे पोळ यातूनही आपत्ती येवू शकते यातून आपदग्रस्ताना
कशा प्रकारे मदत केली जाईल याचे प्रशिक्षण
दिले जाणार आहे. हायवे अथवा
इतर रस्त्यावर मोठया प्रमाणात अपघात होतात परंतु आपण अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आपण टाळतो कारण पोलीसांचा ससेमार टाळण्यासाठी परंतु नवीन कायदयानुसार आता पोलीस
अपघातग्रस्तांना मदत करण्या-यांना कोणतेही उलट सुलट प्रश्न विचारत नाही त्यामुळे
रस्त्यांत झालेल्या अपघातग्रस्तांना तातडीने मदत पुरविली पाहीजे. त्यात
प्रामुख्याने प्राथमिक उपचार, कृत्रिम श्वास देणे, ततडीने दवाखान्यात घेवून जाणे
इत्यादी काम वेळेवर झाले तर त्यांचा प्राण वाचू शकतो असेही त्यांनी यावेळी
सांगितले.
यावेळी एन डी आर एफ चे अरुणकुमार बेरा आपल्या
प्रस्ताविकात म्हणाले की, जळगाव जिल्हयातील महाविद्यालयामध्ये 15 दिवस आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपत्ती टाळण्यासाठीचे वेगवेगळे
प्रात्यक्षिके दाखवून प्रशिक्षण दिले जाणर
असून त्यात आलेल्या आपत्तीतून कशा प्रकारे बचाव करता येईल. तसेच यापूर्वी आलेल्या
आपत्तीचेही विद्यार्थ्यांना उदाहरणासह माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी
यावेळी सांगितले.
नियोजन सभागृहात आज विविध विद्यालयांच्या मुख्याध्यापकांना व विविध विभागाच्या अधिका-यांना आज दिवसभर आपत्तीव्यवस्थाबाबत
मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी एन.डी.आर एफच्या माध्यमातून आपत्ती बाबत
प्रास्ताविके दाखविण्यात आले.
०००
No comments:
Post a Comment