जळगाव, दिनांक 3 - लोकसभा
सार्वत्रिक निवडणूक - 2019 साठी जळगाव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेल्या
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (VVPATs) प्रथमस्तरीय तपासणी (First Level Checking)
12 नोव्हेंबर, 2018 पासून तहसिल कार्यालय, भुसावळ येथील आवारातील शासकीय धान्य
गोदामामध्ये भारत इलेक्ट्रानिक्स लि. बेंगलोर येथील अभियंत्यांमार्फत होणार आहे.
अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
भारत
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इलेक्ट्रनिक मतदान यंत्रांची (VVPATs)
प्रथमस्तरीय तपासणी (First Level Checking) करतेवेळी मान्यता प्राप्त राजकीय
पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित ठेवणेबाबत सुचित करण्यात आले आहे.
त्यानुसार
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय स्तरावरील व राज्य स्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय
पक्षांचे प्रतिनिधी यांनी इलेक्ट्रानिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (First
Level Checking) वेळी तहसिल कार्यालय, भुसावळ येथील आवारात उपस्थित राहता येणार
आहे. गोदाम परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून गोदामात प्रवेश
करणा-या प्रत्येक व्यक्तींला मेटल डिटेक्टरच्या चाचणीस सामोरे जावे लागणार आहे.
तसेच गोदामात कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रानिक वस्तू घेऊन जाता येणार नाही.
मतदान यंत्राच्या प्रथमस्तरीय तपासणीचे व्हिडीओ शुटींग तसेच सी.सी.टी.व्ही.व्दारे
चित्रण केले जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment