जळगाव दि. १ - भुसावळ बाजारपेठ पोलीसांना
कर्तव्यावर असतांना नाहटा चौक, भुसावळ येथे गुटख्याची वाहतूक करीत असताना एक मारुती
व्हॅगनर कार आढळून आली. बाजारपेठ पोलीसांनी पुढील कारवाईकरीता अन्न व औषध
प्रशासनास कळविले.
त्यानुसार दि. २९ ऑक्टोबर, २०१८ रोजी
अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी यांनी घटनेची माहिती घेवून मारुती व्हॅगनर कार
ड्रायव्हरकडे याबाबत विचारपुस केली असता सदरचा गुटखा दिपक रमेश चेतवानी वय वर्षे १८
व त्याची आई सिमरन रमेश चेतवानी वय ३५ वर्षे रा. सिंधी कॉलनी, जळगाव यांचा असल्याचे
तपासात आढळून आले आहे. त्यांचेकडून
केशरयुक्त विमल पानमसालाचे ८ पोते एकूण १८०० पाकीटे प्रत्येकी किंमत १८७ रु. एकूण
किमत रुपये २ लाख ९९ हजार २०० रुपये व व्ही. १ सुंगधीत तंबाखुचे ८ पोते एकूण १६००
पाकीटे प्रत्येकी किंमत रुपये ३० याप्रमाणे एकूण किंमत रुपये ४८ हजार असा एकूण रुपये ३ लाख ४७ हजार २००
रुपयांचा प्रतिबंधीत साठा अनिल गुजर, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी ताब्यात घेतला.
तसेच मारुती व्हॅगनर कार क्रमांक एमएच १९
सीयू ८४१८ ही गाडी गुटख्याची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले आहे.
यापुढे गुटखा वाहतूकीसाठी या कारचा
वापर होवू नये. यासाठी ही कार जप्त करुन पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. ही कारवाई
सहाय्य्क आयुक्त (अन्न) अन्न व प्रशासन औषध प्रशासन, जळगाव श्री. यो. कों.
बेंडकुळे यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री. अनिल गुजर व श्री.
विवेक पाटील यांनी केली आहे. असे प्रसिध्दी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment