जळगाव, दि. 29 - जळगाव जिल्ह्यामध्ये अल्पसंख्यांक आयोगामार्फत अल्पसंख्याक समाजातील तरुणांकरिता पोलीस शिपाई भरतीपूर्व परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रम पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे 10 डिसेंबर, 2018 रोजी आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी दिली आहे.
यापूर्वी भरतीपूर्व परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रम दि. 3 डिसेंबर, 2018 रोजी निश्चित करण्यात आला होता. तथापि, जळगाव जिल्ह्यात दि. 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर, 2018 पर्यंत सैन्य भरती सुरु आहे. त्यामुळे सदरचे भरतीपूर्व प्रशिक्षण हे 5 डिसेंबर, 2018 नंतर घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुसार आता मा. सचिव, महाराष्ट्र शासन, अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील 28 नोव्हेंबर, 2018 नुसार अल्पसंख्याक समाजातील तरुणांकरिता पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सन 2018-19 अतंर्गत उमेदवारांची निवड करणेसाठी 10 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे घेण्यात येणार आहे.
तरी या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांनी 10 डिसेंबर, 2018 रोजी नमुद केलेल्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे. या प्रशिक्षणाबाबत अर्ज तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी निवडीसाठी येताना पुढील कागदपत्रे सोबत आणावी.
प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु 2.50 लाख ( रु. दोन लाख पन्नास हजार फक्त) पेक्षा जास्त नसलेबाबत संबंधित तहसिलदार यांचा दाखला. उमेदवार अल्पसंख्याक (मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, शीख, पारसी आणि जैन) समाजातील असलेबाबत कागदोपत्री पुरावा. उमेदवार 18 ते 25 या वयोगटाबाबत जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला. उमेदवाराची उंची पुरुष 165 सेंमी व महिला 155 सेंमी. छाती पुरुष 79 सेंमी (फुगवून 84 सेंमी) असावी. उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असलेबाबत गुणपत्रक. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हते बाबतची कागदपत्रे, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयाकडे नावनोंदणी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बौध्दांसाठी जातीचा दाखला इ. कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक राहिल. उमेदवार शारिरिकदृष्टया निरोगी व सक्षम असावा. असे जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:
Post a Comment