जळगाव,दि.14,- जळगाव जिल्ह्यातील सर्व
आहरण व संवितरण अधिकारी यांनी आपल्या कार्यालयातून सेवानिवृत्त होत असलेले /
सेवानिवृत्त झालेले अधिकारी/ कर्मचारी यांच्याकरीता विमा छत्र योजना सन 2018-19
च्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच योजना राबविताना
येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित योजना राबविणारी The New India Assurance co. Ltd. Mumbai या संबंधित योजनेत TPA ( Third party Administrator) ची भूमिका
पार पाडणारी MD India Mumbai यांच्या
संयुक्त विद्यमाने जिल्हानिहाय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या
कार्यशाळेत योजने संदर्भातील उपस्थित होणाऱ्या शंकांचे निराकरण करण्यात येणार आहे.
त्यानुसार दि. 16 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा कोषागार कार्यालय,
जळगाव येथे सदरची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
तरी
सदर कार्यशाळेस सर्व आहरण व संवितरण अधिकारी किंवा संबंधित काम करणारे लिपिक यांनी
उपस्थित रहावे. असे श्री. पंडीत, जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment