Saturday, 17 November 2018

रस्ता सुरक्षेसंदर्भात जनजागृती रविवारी महा वॅकेथॉन रॅलीचे आयोजन नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन


          जळगाव, दि. 17 - रस्ता सुरक्षा, नो हॉर्न व सुरक्षित वाहन चालविणे याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८ रोजी सकाळी ठिक ८.०० वा. उप प्रादेशिक परिवाहन कार्यालापासून महा वॅकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
           रस्ता सुरक्षिततेच्यादृष्टिने जनजागृती होण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत राज्यात २०० विविध ठिकाणी एकाच दिवशी एकूण ३ लाख नागरीक सहभागी होणार आहे. जळगाव येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रोटरी  क्लब ऑफ गोल्ड सिटी, शहर वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २ कि.मी. महा वॅकेथॉन रॅली आयोजित केली आहे. या रॅलीत शहराचे महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यासह मान्यवर सहभागी होणार आहे.
            जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, शासकीय, निमशासकीय विभागांचे कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी १८ नोव्हेंबर, २०१८ रोजी सकाळी ७.३० वा. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे उपस्थित रहावे. असे आवाहन श्री. पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
     महा वॉकेथॉनचा मार्ग- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव-मायादेवी मंदीर-काव्यरत्नावली चौक-आकाशवाणी चौक या मार्गाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रॅलीचा समारोप होईल. असे श्री. पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वे कळविले आहे.   
000

No comments:

Post a Comment